प्रधानमंत्री उज्ज्वला योजना / PM Ujjwala Yojana
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हि केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे. या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना विशेषतः महिलांना डिपॉझिट फ्री LPG कनेक्शन देऊन स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन पुरवणे हा आहे. हि योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली होती आणि अधिक लाभार्थ्यांना सामावून घेण्यासाठी आणि अधिक लाभ प्रदान करण्यासाठी वर्षानुवर्षे विस्तार करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे फायदे / Benefits of PM Ujjwala Yojana
- १ मार्च २०२३ पर्यंत PMUY अंतर्गत एकूण ९.५९ कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत.
- देशाअंतर्गत LPG ग्राहकांची संख्या एप्रिल २०१४ मध्ये १४.५२ कोटींवरून वाढून मार्च २०२३ पर्यंत ३१.३६ कोटींपर्यंत वाढली आहे.
- २४ मार्च २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने PMUY च्या लाभार्थ्यांसाठी प्रति वर्ष १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडरला २०० रुपयाची सब्सिडी मंजूर केली आहे.
- गिव्ह इट अप या उपक्रमांअंतर्गत एक कोटींहून अधिक लोकांनी स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान सोडले ज्यामुळे गरजू लोकांना फायदा झाला.
- प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत कोविड १९ दरम्यान PMUY च्या लाभार्थ्यांना १४ कोटींहून अधिक LPG रिफील देण्यात आले.
- महिलांचे पर्यावरण आणि आरोग्य सुधारण्यावर परिणाम करणाऱ्या या योजनेला जागतिक स्तरावरही मान्यता मिळाली आहे.
पीएम युवा २.० योजने अंतर्गत ५०००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अटी आणि शर्ती / Eligibility of PM Ujwala Yojana
- लाभार्थी महिला १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिला अशा गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे ज्यांच्या नावावर LPG कनेक्शन नाही किंवा त्यांच्या घरातील इतर कोणत्याही सदस्याचे नाव नाही.
- सबसिडीची रक्कम घेण्यासाठी महिलेचे कोणत्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेकडे शासनाने विहित केलेल्या आधार कार्ड किंवा ओळखीचा अन्य पुरावा असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेने आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जाद्वारे LPG कनेक्शनसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? / Documentation of PM Ujwala Yojana
- योग्यरीत्या भरलेला अर्ज (उज्ज्वल KYC अर्ज) हा (https://www.pmuy.gov.in/kyc-form.html) वर उपलब्ध आहे किंवा कोणत्याही LPG वितरक कार्यालयातून घेता येतो
- आधार कार्डाची प्रत (किंवा इतर कोणताहि वैध ओळखीचा पुरावा)
- लाभार्थी महिलेचे नाव व बँक पासबुक किंवा पोस्ट ऑफिस खाते
- शिधापत्रिकेची प्रत किंवा शासनाने विहित केलेल्या पात्रतेचा कोणताही पुरावा जसे कि SECC यादी, अंत्योदय अन्न योजना यादी.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा भरावा? / Documentation of PM Ujwala Yojana
- https://www.pmuy.gov.in/kyc-form.html वरून उज्ज्वला KYC अर्ज डाउनलोड करा किंवा कोणत्याही LPG वितरक कार्यालयातून मिळवा.
- अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरा.
- BPL कुटुंब, AAY कुटुंब ह्यांसारख्या आपल्या पात्रता निकषांना सूचित करण्यासाठी योग्य बॉक्सवर टिक करा.
- वरील दिलेली आवश्यक कागदपत्रे अर्जासह संलग्न करा.
- हा अर्ज कागदपत्रांसह आपल्या जवळच्या LPG वितरक कार्यालयात किंवा येथे वेबसाईटवर https://www.pmuy.gov.in/login.aspx.ऑनलाईन सबमिट करा.