शेजारचा देश झेंड्यावर चंद्र लावतो, पण भारताने चंद्रावरच तिरंगा लावला- अनुप अग्रवाल
धुळे प्रतिनिधी
सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये देवाला आणि आपल्या पूज्य व्यक्तीला दंडवत घालून त्याला प्रदक्षिणा करणे, याला महिमा आहे. पण दंडवत आणि प्रदक्षिणा ही शास्त्रार्थानुसार घातली पाहिजे, असे विचार पूज्य गिरी बापूजी यांनी आज चौथे पुष्प गुफतांना केले.
यावेळी आयोजक अनुप अग्रवाल यांनी चांद्र मोहिमेचा महिमा सांगत असताना आपल्या शेजारचा देश त्यांच्या झेंड्यावर चंद्र लावतो. पण आम्ही चंद्रावर तिरंगा लावला असल्याचे सांगितले. यावेळी भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट करून भारत माता की जय असा जयघोष केला.
धुळे शहरातील गोशाळा मैदानात आज शिवमहापुराण कथेचे चौथे पुष्प पूज्य गिरीजी बापूजी यांनी गुंफले. आज हजारो भाविकांनी या कथेचा लाभ घेतला. आजच्या कथा निरुपणामध्ये पूज्य बापूजी यांनी देव आणि पूज्य व्यक्तींना प्रदक्षिणा आणि दंडवत घालण्याचा महिमा सांगितला. भगवान श्री गणेश यांनी देखील माता आणि पिता असणाऱ्या भगवान शिव आणि पार्वती यांना प्रदक्षिणा घालून दंडवत केला आहे. तर भारतात वेगवेगळ्या धार्मिक क्षेत्रांना प्रदक्षिणा करण्याचा शास्त्रार्थ आहे. मात्र दंडवत आणि प्रदक्षिणा ही नियमानुसार घातली गेली पाहिजे. शिवालयामध्ये दंडवत घालत असताना उत्तर दक्षिणे अशा पद्धतीने दंडवत घातला गेला पाहिजे. तर पूजन देखील याच पद्धतीने केले गेले पाहिजे ,असे त्यांनी सांगितले. भगवान शिव हे सर्व जगाच्या कष्टांचा नाश करतात .मात्र लोकांना त्यांच्या तिसऱ्या डोळ्याचे नाव घेऊन घाबरवले जाते. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी काळकुट विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांना निळकंठ म्हटले जाते. असेही ते म्हणाले. सध्या महाशिवरात्रीला व्यसन करण्याची चुकीची माहिती दिली जाते. तसेच कोणताही तोटका प्रयोग करणे म्हणजे महादेवाची भक्ती नव्हे. मादक पदार्थाचे सेवन करणे म्हणजे भगवान शंकराची भक्ती नाही, असे त्यांनी सांगितले. शिवालयात गेल्यानंतर नंदी महाराजांचे दर्शन सर्वात आधी केले जाते. मात्र गोमातेची सेवा करणाऱ्यांनाच नंदी महाराजांचे दर्शन करण्याचे अधिकार आहेत. आज अनेकांची नीती भ्रष्ट झाली आहे .आपल्या मालकाच्या भल्यासाठी शेतात राबणाऱ्या बैलाला कसायाला विकले जाते. ही बाब अत्यंत चुकीची आहे. गुजरातमध्ये गोशाळेप्रमाणेच वृद्ध बैलांना सांभाळणाऱ्या बैल शाळा काढण्यात आले आहे .वृद्ध बैलांना तेथे ठेवले जाते .यामुळे शेतकऱ्यांनी देखील कसायाला बैल विकणे थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी राजस्थानचे श्री १००८ राम रिशपाल जी महाराज यांनी देखील आपले विचार प्रगट केले. परमेश्वरांनी 64 कोटी योनी मधील प्रत्येक प्राणीमात्रासाठी वेगवेगळे शरीर बनवले. पण मानव शरीर मिळणे ,ही मोठी दुर्लभ पुण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मानव शरीराचा भक्तीसाठी उपयोग केला पाहिजे. संकृती, पूजन संस्कृती आणि सत्यता या गोष्टी आपल्या देशात असल्यामुळे जगात भारतासारखा दुसरा देश नाही. हिंदू दयाळू आणि परोपकारी आहे. त्यामुळे तो पाठ पूजा करतो. अन्य धर्मात पाठ आणि पूजा केली जात नाही. भक्ती आणि पूजेने आत्मा शुद्ध होते. भक्ती विना मानव जीवन शोभा देत नाही ,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची माहिती देताना आयोजक अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ घेण्याची नोंदणी करण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहे. आज या संदर्भात 300 जणांची नोंदणी करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करत असताना त्यांनी सांगितले की, आपल्या शेजारचा देश त्यांच्या झेंड्यावर चंद्राची प्रतिमा लावतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने चंद्रावरच तिरंगा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे आपल्या देशाचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे ,असे सांगतात हजारो भाविकांनी भारत माता की जय असा जयघोष केला.
आज माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते तसेच नगरसेवक संतोष खताळ, बन्सीलाल जाधव, दगडू बागुल, सौ मंगला पाटील, राजेश पवार, अमोल मासुळे ,शितलकुमार नवले, प्रवीण अग्रवाल, हिरामण गवळी, शशी मोगलाईकर, अभियंता चंद्रकांत उगले यांनी आरती केली.