कोरोनाच्या संक्रमणात राज्यात सर्वात चांगले काम करणारे अनुप अग्रवाल यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्गार, धुळे शहर विधानसभेच्या उद्घाटन

धुळे प्रतिनिधी

कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये जीवाचा धोका असताना देखील स्वतःच्या जीवाची तसेच आपल्या परिवाराची चिंता न करता धुळेकर जनतेसाठी राज्यात सर्वात चांगले काम धुळे भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केले. आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने जनतेला मदतीचा हात देण्याचे हे कार्य प्रशंसनीय असल्याचे उद्गार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. यावेळी त्यांनी धुळे शहर विधानसभे च्या उमेदवारीसाठी अनुप अग्रवाल यांना हिरवा कंदील दाखवला.

धुळे शहर विधानसभेच्या प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या वार रूमचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच रवी अनासपुरे ,जिल्हाध्यक्ष बबन चौधरी ,शहर महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, नमो चषकचे प्रमुख प्रतापराव दिखावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .यावेळी ओबीसी सेलचे प्रमुख दिनेश बागुल, नगरसेविका मायादेवी परदेशी आणि हिरामण गवळी यांनी ओबीसी मोर्चाची कार्यकारिणीची यादी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सोपवली. यावेळी अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागसेन बोरसे यांनी देखील मान्यवरांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी केले. यानंतर वॉररूमचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरोना काळात अनुप अग्रवाल यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले .कोरोनाचा काळ हा प्रत्येकासाठी धोकादायक असा होता. मात्र स्वतःची आणि परिवाराची पर्वा न करता अग्रवाल यांनी धुळेकर जनतेसाठी औषध आणि सर्वच प्रकारची मदत पुरवली .ही बाब प्रशासनीय असून महाराष्ट्रात सगळ्यात चांगले काम या माध्यमातून उभे राहिले आहे ,असे ते म्हणाले. देशात 527 वर्षांपासून राम लल्ला तंबूमध्ये होते. मात्र भारतीय जनता पार्टीच्या सरकारने भव्य राम मंदिर उभारले असून 22 जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे. या राम लल्लाच्या दर्शनासाठी धुळे शहरातील हजारो लोकांना नेणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी अनुप अग्रवाल यांनी विशेष रेल्वे गाडीने धुळेकर जनतेला अयोध्या येथे जाता येईल. याशिवाय वातानुकुलित बस देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले. 22 तारखेच्या या महा दिवाळीसाठी धुळ्याच्या अग्रवाल नगर परिसरामध्ये राम मंदिराची प्रतिकृती उभारणार असून त्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जाणार असल्याचे सांगताच टाळ्यांच्या कडकडाटात जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमात बोलत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच उपस्थित कार्यकर्त्यांना धुळ्याचा आमदार कसा असावा असे विचारताच अनुप अग्रवाल यांच्या नावाची घोषणाबाजी सुरू झाली .त्यामुळे बावनकुळे यांनी वॉररूमचे प्रमुख हा फलक आता बदलावा लागेल ,असे सूचक वक्तव्य करून विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनुप अग्रवाल यांना उमेदवारीचा हिरवा कंदील दाखवला.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकासाचे काम सुरू केले आहे. भारतीय जनता पार्टी ही संस्कार, देव, देश, संस्कृती, धर्म यासाठी काम करणारा पक्ष आहे. हा विषय अंतोदयाचा आहे. आघाडीचा घटक पक्ष असणारा तामिळनाडूचा स्टलिंन हा सनातन धर्म संपवण्याची भाषा करतो. पण जनता त्यांचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही ,असे देखील त्यांनी सांगितले. आगामी काळात कार्यकर्त्यांनी देखील धुळे लोकसभेची तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागांसाठी 51 टक्के मते मिळतील, अशा दृष्टीने काम केले पाहिजे. या जिल्ह्यातील आमदारांच्या सर्व जागा तसेच खासदार देखील निवडून येईल यात मला कोणतीही शंका वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment